रतन टाटा राज्य Skill University च्या शाखा ५० ठिकाणी होणार

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

मुंबई :

सिंगापूरच्या कौशल्य विद्यापीठाच्या धर्तीवर राज्यात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने आगामी वर्षापर्यंत ५० ठिकाणी शाखा सुरू कराव्यात. तसेच या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकरीची हमी मिळेल अशा स्वरूपाची विद्यार्थ्यांची तयारी सिंगापूरच्या कौशल्य विद्यापीठाच्या धर्तीवर तयार करून घ्यावी असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.

एल्फिस्टन तांत्रिक विद्यालयाच्या मध्यवर्ती रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या तिसऱ्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी मंत्री लोढा बोलत होते. या कार्यक्रमाला रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, राज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्त डॉ. अमित सैनी, राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सुर्यवंशी, आयुषचे नॅशनल रिसर्च प्रोफेसर प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यावेळी उपस्थित होते.

Skill शिक्षणातून उद्योजक घडविण्यावर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन शैक्षणिक धोरणातून ‘कौशल्यावर आधारित’ शिक्षण देत आहोत. राज्यात मुख्यमंत्री महाफंड योजनेअंतर्गत तीन टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेतून राज्यात २ लाख उद्योजक घडविणार आहोत. ५० हजार स्टार्टअप्सपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. निवडक स्टार्टअप्सना सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. राज्यातील ४१७ आयटीआयमध्ये मुख्यमंत्री महाफंड योजनेतून उद्योजक घडविण्यासाठी आयटीआयजवळ जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

महाराष्ट्रात कौशल्याचे ‘सिंगापूर मॉडेल’ आणायचेय

सिंगापूरच्या प्रगतीचे रहस्य त्यांच्या ‘एज्युकेशनल रिफॉर्म्स’ आणि ‘स्किल डेव्हलपमेंट’मध्ये दडलेले आहे. तिथल्या अर्थव्यवस्थेचा कणा शिक्षण आणि तंत्रज्ञान आहे. सिंगापूरमध्ये जिथे केवळ २५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती देणारे प्रकल्प उभे राहतात. तिथे १०० टक्के रोजगाराची हमी दिली जाते. आपल्यालाही महाराष्ट्रात हेच ‘सिंगापूर मॉडेल’ कौशल्य विकासाच्या माध्यमातून आणायचे आहे. प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कामाला सन्मान यामुळे मिळणार असल्याचे लोढा म्हणाले.

हेही वाचा :  राज्यात १०० ‘महात्मा फुले Skill Training केंद्र’ उभारणार

यावेळी आयडिशेन कॉम्पिटिशन सहित विविध स्पर्धातील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. राजेश तलवारे यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत, ‘सर्वोत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *