‘हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे AAPLA DAWAKHANA’चे होणार ऑडिट
मुंबई :
राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. या दवाखान्यामार्फत दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचा दर्जा उंचावणे आणि निधीचा पारदर्शक वापर होत आहे का याची पडताळणी करण्यासाठी ‘आपला दवाखान्या’चे लेखापरिक्षण करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यासाठी आपला दवाखना स्तरावर जन आरोग्य समिती स्थापन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व आयुष्मान आरोग्य मंदिर नागरी आरोग्य केंद्रांमध्ये जन आरोग्य समितीची स्थापना करून तेथील सुविधांचा लेखाजोखा घेतला जातो. त्याच धर्तीवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांतील आरोग्य सुविधांचा दर्जा वाढविण्याससाठी तसेच निधीच्या योग्य व पारदर्शक वापरासाठी जन आरोग्य समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती आरोग्य सेवांचा दर्जा सुधारणे, नागरिक, रुग्णांच्या आरोग्यविषयक समस्यांचे गुणात्मक निराकरण करणे, विभागांतर्गत समन्वय साधणे, आरोग्यविषयक कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करणे, आरोग्य संस्था बळकटीकरण करणे व त्यासाठी उपलब्ध निधीचा सुयोग्य व पारदर्शक विनियोग होत आहे का? यावर काम नियंत्रण ठेवणार आहे.

Aapla Davakhan समितीमार्फत करण्यात येणारी कामे
नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जन आरोग्य समितीप्रमाणे आपला दवाखान्याच्या जन आरोग्य समितीसाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार ही जन आरोग्य समिती महानगरपालिका क्षेत्राकरीता नागरी एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीचा व नगरपरिषदा व नगरपंचायती व कटकमंडळे क्षेत्रांसाठी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीचा एक अविभाज्य घटक म्हणून कामकाज करेल. आरोग्य सेवा सुविधांचे प्रशासकिय व्यवस्थापन व जबाबदाऱ्या, सामाजिक उत्तरदायित्व व समुदायाचा सहभाग वाढविण्यासाठी संस्थात्मक व्यासपीठ निर्माण करणे, उपलब्ध निधीचा योग्य वापर व व्यवस्थापन करणे आणि आरोग्य यंत्रणेसोबत समन्वय साधण्यास एक छत्र म्हणून कार्य करेल. समुदाय स्तरावरील विविध वयोगटातील रुग्णांस उपचार व प्रयोगशालेय चाचण्याच्या सोयीसाठी पाठपुरावा करणे व त्यास प्रोत्साहन देणे, रुग्णांना दर्जेदार व निकोप आरोग्य सेवा उपलब्धता, जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी व तक्रार निवारणासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करेल. नागरी भागात आरोग्य सेवेचा दर्जा उंचविण्यासाठी शासकिय विविध आरोग्यविषयक योजना, सी. एस. आर. आणि धर्मादाय संस्था यांच्याकडून देणगीव्दारे निधी न स्वीकारता वस्तु स्वरुपात साहित्य प्राप्त करण्यासाठी समिती प्रयत्न करेल.
अशी असेल समिती
जन आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रभाग सदस्य असेल. त्याचबरोबर प्रभाग स्तरीय वैद्यकीय अधिकारी हा सह अध्यक्ष, विविध वैद्यकीय अधिकारी हे सदस्य सचिव असतील तसेच १४ पदसिद्ध सदस्य आणि पाच सर्वसाधारण सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य या समितीमध्ये असणार आहे.


