leprosy : वृद्ध कुष्ठरुग्णांच्या उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टर नेमा

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे रुग्णालय प्रशासनाला निर्देश

मुंबई :

ॲक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय येथे दीर्घकाळ उपचार घेणाऱ्या वयोवृद्ध रुग्णांच्या सहव्याधींवर उपचार व्हावेत, यादृष्टीने विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी रुग्णालय प्रशासनास दिले. ॲक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शुक्रवारी भेट दिली. पुरातन वास्तू असलेल्या रुग्णालय इमारतीच्या अंतर्गत कक्षांची कामे आणि आंतररुग्ण विभागाच्या दुरूस्ती कामांची पाहणीदेखील त्यांनी केली. रुग्णालय परिसराच्या आवारातील केईएम रुग्णालयाच्या विद्यार्थी वसतिगृह इमारतीच्या कामाचा आढावादेखील त्यांनी यावेळी घेतला.

leprosy रुग्णालयातील विविध विभागांचा आढावा घेतला

ॲक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालयाची इमारत १३ एकर आवारात उभारण्यात आली आहे. याठिकाणी प्रशासकीय इमारत, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, स्मशानभूमी, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आदी कार्यालये आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शुक्रवारी दिलेल्या भेटीवेळी रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थान, संग्रहालय, बाह्यरूग्ण विभागाच्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधा, रुग्णालय परिसरातील पुरातन वास्तू विषयक संबंधित कामांचा आढावा त्यांनी घेतला. त्याशिवाय रुग्णालय परिसरातील केई,म रुग्णालयाच्या ८०० विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहाच्या इमारतीच्या पाहणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या सुविधेच्या अनुषंगाने विद्युत जोडणीशी संबंधित कामे वेगाने करण्याचे निर्देशही त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले.

Acworth Municipal Leprosy Hospital voice of eastern
ॲक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय

 

तीन वर्षांत १८०० leprosy रुग्णांवर उपचार

सद्यस्थितीला ॲक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालयात सद्यस्थितीला दैनंदिन ६० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येतात. गत तीन वर्षांमध्ये १८०० हून अधिक रुग्णांनी बाह्यरुग्ण विभागातील सुविधांचा लाभ घेतला. या रुग्णांपैकी कुष्ठरोगाचे निदान झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कुष्ठरोग रुग्णालयात सध्या ५५ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांमध्ये ३० पुरूष आणि २५ महिलांचा समावेश आहे. रुग्ण कक्षाच्या ठिकाणी डॉ. विपिन शर्मा यांनी भेट देऊन रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर वृद्धत्वामुळे रुग्णांना भेडसावणाऱ्या सहव्याधींवर उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. या भेटीदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंद्रकांत पवार, ॲक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. अमिता पेडणेकर, रुग्णालयाचे उप अधिष्ठाता डॉ. अविनाश खाडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :  गोरेगाव drug case : उपनगर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा ॲक्शन मोडमध्ये

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *