मुंबई-कोकणातील शेकडो School बंद होण्याची भीती
संचमान्यतेत दुरुस्ती करा- अनिल बोरनारे यांचं शिक्षणमंत्र्यांना साकडं
मुंबई :
१५ मार्च २०२४ च्या संच मान्यतेच्या जीआर मध्ये सुधारणा न झाल्यास मुंबईसह कोकणातील अनेक शाळा बंद पडतील अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने संच मान्यता दुरुस्त करण्याची मागणी मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली. याबाबत अधिक बोरनारे यांनी आज मुंबईत शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांची त्यांच्या जंजिरा बंगल्यावर भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून मागणी केली.
१५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा जीआर हा अन्यायकारक असून या जीआरमुळे मुंबई कमीपटाच्या तसेच कोकणातील दुर्गम डोंगराळ व आदिवासी भागातील शेकडो तुकड्या बंद पडणार असून विद्यार्थी असून शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या जीआर मध्ये सुधारणा करून ९ वी व १० वी च्या वर्गांना प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक देण्यात यावा असे शिक्षणमंत्र्यांना सांगितले.
संचमान्यतेत ९ वी व १० वीच्या वर्गांना विद्यार्थी संख्येची अट टाकल्याने अनेक कमी विद्यार्थी असलेल्या तुकड्यांच्या शाळांना संचमान्यतेत शून्य शिक्षक दाखवीत आहे. त्यामुळे विद्यार्थी असून शाळांना शिक्षक मिळणार नाही, याचा फटका मुंबईसह कोकणातील आदिवासी डोंगराळ व दुर्गम भागातील शाळांना बसणार असून विद्यार्थी असून शाळेत शिकवायला शिक्षक नसतील परिणामी विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण वाढण्याची भीती शिक्षणक्षेत्रात निर्माण झाली आहे.
हेही वाचा : अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‘डायनॅमिक’ KHO-KHOचा धडाका
संचमान्यतेच्या जिआरमुळे मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. तसेच या सर्व अतिरिक्त शिक्षकांचे शिक्षण संचालकांनी तातडीने समायोजन करण्याचे ठरवले असून इयत्ता दहावीच्या परीक्षा कशा पार पाडाव्यात मोठ्या प्रश्न केंद्र संचालक असलेल्या मुख्याध्यापक तसेच शिक्षकांना पडला आहे



