Nanavati Max Hospital : काचेचे तुकडे डोळ्यात शिरलेल्या व्यक्तीला दिली दृष्टी

मुंबई :

मुंबईतील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी डोळ्याच्या एक दुर्मिळ आणि गंभीर दुखापतीवर यशस्वी उपचार केले आहेत. त्यामुळे ४४ वर्षीय एअरपोर्ट कर्मचाऱ्याचा डोळा यशस्वीपणे वाचवला आहे. कामावर असताना एक अपघात झाला तेव्हा या व्यक्तीचा चष्मा फुटला आणि त्याच्या डाव्या डोळ्यात काचेचे दोन मोठे तुकडे घुसले होते.

नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल voice of eastern
नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

विमानतळावर सामानाची ने-आण करत असताना, लगेज बेल्टचा पट्टा अचानक तुटला आणि थेट सचिन निकम यांच्या चेहऱ्यावर येऊन आदळला. या जोरदार फटक्यामुळे त्यांचा चष्मा फुटला आणि काचेचे अनेक तुकडे त्यांच्या डाव्या डोळ्यात आणि पापणीत घुसले. या अपघातानंतर त्यांना तातडीने आपत्कालीन विभागात आणण्यात आले; त्यावेळी त्यांना असह्य वेदना, खूप रक्तस्त्राव होत होता आणि मळमळ देखील होत होती. तपासणी दरम्यान, डॉक्टरांना डोळ्याचे आणि त्याच्या आजूबाजूच्या भागाचे प्रचंड नुकसान झाल्याचे आढळून आले. या दुखापतीमुळे त्यांच्या डोळ्याच्या पापणीची कडा दोन ठिकाणी फाटली होती; तसेच डोळ्याचा कॉर्निया आणि डोळ्याचा पांढरा बाहेरील भाग (स्क्लेरा) यांना जोडणाऱ्या भागाला गंभीर जखमा झाल्या होत्या. डोळ्याच्या आतही मोठे नुकसान झाले होते, ज्यामध्ये डोळ्यातील अंतर्गत जेल आणि डोळ्याचा आतील पडदा बाहेर आले होते. डोळ्याला बसलेला फटका इतका भीषण होता की, डोळ्यातील नैसर्गिक लेन्स नेमकी कुठे आहे, हे देखील शोधता येत नव्हते.

Nanavati Max Hospital : जखमा बऱ्या करण्यासाठी रुग्णाला ३० हून अधिक टाके

इमर्जन्सी मेडिकल टीमने अतिशय तातडीने जखमेवर उपचार सुरू केले, अँटीबायोटिक्स दिली, डोळ्याचे रक्षण केले, शस्त्रक्रियेपूर्वीच्या आवश्यक तपासण्या पूर्ण केल्या आणि रुग्णाला तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्याची व्यवस्था केली. हॉस्पिटलमध्ये आल्यावर अवघ्या काही मिनिटांतच, नानावती मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील कन्सल्टंट- ऑप्थॅल्मोलॉजिस्ट डॉ. जिमित चौधरी आणि त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली रुग्णाला तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी तयार करण्यात आले. शस्त्रक्रियेदरम्यान, डॉक्टरांनी डोळ्यात रुतलेले काचेचे तुकडे बाहेर काढले आणि खराब झालेला डोळा व पापणीची दुरुस्ती केली. या गंभीर जखमा पूर्णपणे बऱ्या करण्यासाठी रुग्णाला ३० हून अधिक टाके घालावे लागले. डोळ्याचा मूळ आकार आणि ठेवण व्यवस्थित राहावी तसेच रुग्णाची दृष्टी परत येण्याची शक्यता जास्तीत जास्त वाढावी, यासाठी नुकसानग्रस्त पेशींवर उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी नमूद केले की जर तातडीने वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया केली नसती, तर रुग्णाचे डोळे कायमचे निकामी झाले असते, गंभीर संसर्ग झाला असता, डोळ्याच्या रचनेचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले असते आणि चेहऱ्याचा किंवा डोळ्याचा आकार गंभीरपणे बिघडू शकला असता.

या केसबद्दल बोलताना नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कन्सल्टंट-ऑप्थॅल्मोलॉजिस्ट (नेत्ररोग तज्ज्ञ) डॉ. जिमित चौधरी म्हणाले, “डोळ्याला झालेली दुखापत अत्यंत गंभीर होती आणि जखम आतपर्यंत रुतलेली होती, ज्यामध्ये दृष्टी कायमची जाण्याचा धोका खूप जास्त होता. अशा प्रकरणांमध्ये प्रत्येक मिनिट खूप महत्त्वाचे असते, कारण उशीर झाल्यास कधीही भरून न निघणारे नुकसान होऊ शकते, संसर्ग होऊ शकतो किंवा डोळा कायमचा गमवावा लागू शकतो. रुग्ण आमच्याकडे वेळेत पोहोचला, ज्यामुळे आमच्या आपात्कालीन सेवा आणि नेत्ररोग विभागाच्या टीमला वेगाने पावले उचलता आली. डोळा सुरक्षित ठेवणे, झालेल्या मोठ्या नुकसानाची दुरुस्ती करणे आणि दृष्टी परत मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता निर्माण करणे, यालाच आम्ही सर्वाधिक प्राधान्य दिले.”

Nanavati Max Hospital : इमर्जन्सी विभाग गंभीर परिस्थितीसाठी तयार

मॅक्स हेल्थकेअरचे पश्चिम क्षेत्राचे सीनियर डायरेक्टर आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. विवेक तळावलीकर म्हणाले, “जेव्हा प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो, तेव्हा वेळेवर मिळालेले उपचार, डॉक्टरांचे कौशल्य आणि टीममधील उत्तम समन्वय यामुळे उत्तम परिणाम मिळू शकतात, हे या केसमधून दिसून येते. आणीबाणीच्या परिस्थितीचे आधीपासून नियोजन करता येत नाही. परंतु, शरीराच्या कोणत्याही महत्त्वाच्या भागाला दुखापत किंवा अचानक बिघाड झाल्यास, रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना तज्ञ डॉक्टरांचे उपचार त्वरित उपलब्ध होतील या खात्रीची गरज असते. नानावटी मॅक्स हॉस्पिटलचा इमर्जन्सी विभाग अशाच गंभीर परिस्थितीसाठी तयार करण्यात आला आहे, जिथे २४ तास तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, रुग्णाची तातडीने तपासणी करण्याची व्यवस्था, रुग्णाच्या बेडपाशीच प्रगत चाचण्यांची सोय आणि विविध विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांची लगेच मदत मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.”

हेही वाचा : Sejal Pawar : १५ दिवसाच्या सक्तीच्या रजेवर पाठवले

रुग्णाची प्रकृती आता वेगाने सुधारत असून त्यांना आता प्रकाशाची हालचाल जाणवत आहे आणि हाताच्या हालचाली ओळखता येत आहेत. त्यांच्या डोळ्यांची हालचाल नेहमीसारखी सामान्य आहे, हे त्यांची तब्येत सुधारत असल्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. रुग्णावर यापुढेही बारीक लक्ष ठेवले जाईल आणि त्यांच्या प्रकृतीमधील सुधारणा व पुढील वैद्यकीय तपासणीच्या अहवालानुसार, त्यांना दुय्यम लेन्स बसवणे आणि डोळ्याच्या पडद्यावरील उपचार यासारख्या अतिरिक्त उपचारांची गरज भासू शकते. हे लक्षणीय यश नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील इमर्जन्सी मेडिसिन, नेत्ररोग विभाग, ॲनेस्थेशिया, सर्जिकल आणि नर्सिंग टीमच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे; ज्यामुळे रुग्णावर वेळेत उपचार केले गेले आणि दृष्टी वाचवण्याची जास्तीत जास्त संधी मिळाली.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत