CET CEll : विधि अभ्यासक्रमाच्या ७८ महाविद्यालयांना मान्यता

३६०० जागा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई :

सर्वोच्च न्यायालयाने सर्व विधि महाविद्यालयांना बार कौन्सिलची मान्यता बंधनकारक केल्याने विधि तीन वर्षे व पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीमधून २९३ महाविद्यालये गायब झाली होती. यामध्ये नामांकित महाविद्यालयांचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांसमोर पसंतीक्रम भरण्याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. मात्र मागील दोन दिवसांमध्ये ७८ महाविद्यालयांनी बार कौन्सिलची मान्यता मिळवल्याने प्रवेश प्रक्रियेसाठी ३ हजार ६०० जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

CET Exam : बी.एड., तीन वर्षीय एलएलबी अभ्यासक्रम नोंदणी सुरू
राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्ष

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अर्ज करूनही राज्यातील अनेक विधि महाविद्यालयांना मान्यता मिळाली नव्हती. त्यामुळे अनेक महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडली होती. ३ व ५ वर्षीय विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस ५ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली. यावेळी राज्यात तीन वर्षीय विधि अभ्यासक्रमाचे २१८ पैकी ९३ महाविद्यालये व त्यातील १० हजार १०५ जागा उपलब्ध होत्या. तसेच ५ वर्षीय विधि महाविद्यालयाच्या १६१ महाविद्यालयांपैकी ५६ महाविद्यालये व त्यातील ५ हजार ९५५ जागा उपलब्ध होत्या. यामध्ये नामांकित महाविद्यालयांचा समावेश होता. त्यामुळे विधि तीन वर्ष व पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम भरताना विद्यार्थ्यांची अडचण होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात येत होती. याची दखल घेत सीईटी कक्षाने प्रथम फेरीसाठी प्राधान्यक्रम भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेत सुधारित वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार ९ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येणार आहे. तसेच तीन वर्षीय विधिचे जागावाटप १२ ऑगस्ट तर ५ वर्षीय विधिचे जागावाटप १३ ऑगस्टला होणार आहे.

दरम्यान, मागील दोन दिवसांमध्ये तीन वर्ष व पाच वर्ष विधि महाविद्यालयाच्या ७८ महाविद्यालयांना मान्यता मिळाली. त्यामुळे पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी ३ हजार ६०० जागा उपलब्ध झाल्या आहेत. मान्यता मिळालेल्या या महाविद्यालयांमध्ये तीन वर्ष विधीच्या ४१ महाविद्यालयांना मान्यता मिळाली असून, महाविद्यालयांची संख्या १३४ झाली आहे. तसेच २ हजार २५० जागा उपलब्ध झाल्याने जागांची संख्या १२ हजार ३५५ झाली आहे. तसेच राज्यात ५ वर्षीय विधिच्या ३७ महाविद्यालयांना मान्यता मिळाल्याने महाविद्यालयांची संख्या ९३ इतकी झाली आहे. तसेच १ हजार ३५० जागा उपलब्ध झाल्याने जागांची संख्या ७ हजार ३०५ झाली आहे. आणखीनही नवीन महाविद्यालये या यादीमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता असून, महाविद्यालयाच्या अद्ययावत यादीसाठी सीईटी कक्षाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन माहिती सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.

CET Cell : विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम बदलण्याची संधी

५ ऑगस्ट रोजी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यांनतर मागील दोन दिवसांमध्ये ७८ महाविद्यालयेन प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम बदलण्याची सुविधा सीईटी कक्षाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगीनमध्ये जाऊन नवीन उपलब्ध महाविद्यालयांचा पसंतीक्रमामध्ये समावेश करू शकतात. ९ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम बदलता येणार आहे.

हेही वाचा : Junior Indoor Cricket : राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धा जळगावात

सुधारित वेळापत्रक

तीन वर्षीय विधि

  • प्राधान्यक्रम भरणे – ९ ऑगस्ट
  • जागावाटप – १२ ऑगस्ट २०२६ रोजी
  • कागदपत्राची पडताळणी आणि प्रवेश निश्चिती – १३ ते १८ ऑगस्ट

पाच वर्षीय विधि

  • प्राधान्यक्रम भरणे – ९ ऑगस्ट
  • जागावाटप – १३ ऑगस्ट
  • कागदपत्राची पडताळणी आणि प्रवेश निश्चिती – १४ ते १९ ऑगस्ट

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत