Mumbai University ची प्रतिमा मलीन करण्याचा राजेश  बलखंडे यांचा प्रयत्न

कलिना संकुलातील आंदोलन बेकायदेशीर; चर्चेला वारंवार नकार

मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलामध्ये भदंत राजेश बलखंडे हे मागील काही दिवसांपासून करत असलेले आंदोलन हे बेकायदेशीर असल्याचे मुंबई विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बलखंडे यांना वारंवार चर्चेला बोलावूनही नकार देणे, चर्चेला आल्यास आडमुठी भूमिका घेणे, कोणाचेही न ऐकता बैठकीत निघून जाण, असे प्रकार केले जात आहेत. तसेच विद्यापीठ परिसरामध्ये नामवंत व्यक्तींना बोलवून सामाज माध्यमातून विद्यापीठाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न बलखंडे यांच्याकडून केला जात असल्याचे मुंबई विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी प्रशासन सुरुवातीपासूनच सकारात्मक आणि आग्रही असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.

भदंत राजेश बलखंडे voice of eastern
भदंत राजेश बलखंडे

बलखंडे यांच्या मागण्यासंदर्भात चर्चेसाठी मुंबई विद्यापीठ प्रशासनातर्फे कुलसचिव यांनी २६ ऑगस्ट २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे बोलावले असता त्यांनी नकार दिला. त्यानंतर कुलसचिव आणि बीकेसी पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक व सुरक्षा अधिकारी यांनी आंदोलनस्थळी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी काही न ऐकता आंदोलन कायम ठेवले. त्यानंतर ११ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांनी बैठकीला बोलवले होते. यावेळी विद्यापीठ प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारी, तसेच पोलिस अधिकारी व सुरक्षा अधिकारी हजर होते. त्यांच्या विविध मागण्यासंदसंदर्भात सुमारे दीड ते दोन तास सकारात्मक चर्चा झाली. मात्र यावेळीही बैठक चालू असताना ते बैठकीतून निघून गेले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि काही सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही ते कोणाचेही न ऐकता निघून गेले. अनेकवेळा चर्चेसाठी बोलावूनही ते प्रतिसाद देत नसल्याचे मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

Mumbai University : दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे गैरसमज

बलखंडे यांना आंदोलन मागे घेण्याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. बलखंडे हे मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाच्या विरोधात आकस बुध्दीने, जाणुनबूजून विविध चित्रफिती समाज माध्यमांद्वारे पसरवून देशभरामध्ये मुंबई विद्यापीठाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या चुकीच्या प्रकारे चाललेल्या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला हानी पोहचत असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या मान्यवरांनी पूर्वकल्पना दिल्यास विद्यापीठ प्रशासन आपली भूमिका तपशीलवार मांडण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. एकतर्फी आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे गैरसमज निर्माण होत असल्याने वस्तुस्थिती सर्वांसमोर मांडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा : CTET २०२६ चा निकाल जाहीर; २५.६८ टक्के उमेदवार उत्तीर्ण

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत