CTET २०२६ चा निकाल जाहीर; २५.६८ टक्के उमेदवार उत्तीर्ण

मुंबई :

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) फेब्रुवारी २०२६ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या परीक्षेच्या २१ व्या आवृत्तीचा निकाल सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल २५.६८ टक्के इतका नाेंदवला गेला आहे.

शिक्षकांची रिक्त पदे भरण्यास मंजुरी
School Teacher

सीबीएसईने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पेपर-१ साठी १२ लाख ११ हजार ६११ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १० लाख ६५ हजार ४१० उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले. यापैकी ३ लाख ५८ हजार ९३७ उमेदवार उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण ३३.६९ टक्के आहे. पेपर-२ साठी २१ लाख ५६ हजार ४५९ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १८ लाख ६७ हजार ४२८ उमेदवारांनी परीक्षा दिली. यामध्ये ३ लाख ४६ हजार ७३८ उमेदवार उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण १८.५६ टक्के आहे. मात्र या दोन्ही परीक्षेच्या एकत्रित उत्तीर्णतेचे प्रमाण २५.६८ टक्के नोंदवले गेले आहे.

दरम्यान, उमेदवारांनी सीटीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच लवकरच उमेदवारांचे मार्कशीट आणि पात्रता प्रमाणपत्र डिजीलॉकरवर अपलोड करण्यात येणार आहेत. उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन अर्जात दिलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे डिजीलॉकरमधून प्रमाणपत्रे डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

CTET 2026 चा निकाल सुधारला

सीटीईटी फेब्रुवारी 2026 चा निकाल मागील वर्षांच्या तुलनेत सुधारलेला असला, तरी एकूण पात्रता केवळ २५.६८ टक्के आहे. यावरून परीक्षेची काठीण्यता आणि गुणवत्तेचा उच्च निकष स्पष्ट होतो. सरकारी पातळीवर मार्गदर्शन व ठोस उपाययोजनांचा अभाव जाणवत असल्याने असंख्य शिक्षक उमेदवारांमध्ये या संदर्भात वेळोवेळी उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तरीही शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी व सेवेत असलेल्या शिक्षकांनी बाह्य अपेक्षांवर अवलंबून न राहता स्वअभ्यास, सातत्यपूर्ण सराव आणि संकल्पबळ यांच्या आधारे तयारी करून हे यश संपादन केले आहे. भविष्यात गुणवत्तापूर्ण शिक्षक घडवण्यासाठी प्रशिक्षण प्रणालीत सुधारणा होणे गरजेचे आहे. यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्नपूर्वक नेमकेपणाने काम होणे आवश्यक असल्याचे मत यशवंतराव चव्हार सेंटरचे शिक्षण विकास मंचचे मुख्य समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : Cama Hospital : ‘जनुकीय समुपदेशन विभाग’ १ एप्रिलपासून सुरू

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत