E-Buses : चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारा – मुख्यमंत्री

मुंबई :

‘विकसित महाराष्ट्र अंतर्गत’ पर्यंत एसटी महामंडळामध्ये 2029 पर्यंत 50 टक्के, 2035 पर्यंत 80 टक्के; तर 2047 पर्यंत एसटीचा 100 टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरीत करायचा आहे. या अनुषंगाने बसेससाठी आवश्यक असलेले चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

devendra fadnvis - voice of eastern
देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथील निवासस्थानी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इ-बसेससंदर्भात बैठक झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, अपर मुख्य सचिव संजय सेठी, एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उपसचिव चेतन निकम आदी या बैठकीस उपस्थित होते.

पर्यावरणपूरक ई-बसेस चालविण्यात येणाऱ्या मार्गाचा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून अभ्यास करावा. पुरवठादाराकडून बस उपलब्ध होताच त्या बसेसचे तातडीने पुढील 7 दिवसांमध्ये निरीक्षण करावे. या बसेससाठी स्वतंत्र इकोसिस्टिम तयार करावी. तसेच ज्या मार्गाने खासगी बसेस चालविण्यात येतात, त्या मार्गाचाही अभ्यास करून तेथे ई-बसेसचा पर्याय तयार ठेवावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

E-Buses : वापर वाढविण्यासाठी २० लाख अनुदानाची तरतूद

राज्य शासनाच्या विद्यमान ई-वाहन धोरणांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई-बसेसचा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1,500 ई-बसेसना बसच्या किमतीच्या 10 टक्के किंवा कमाल 20 लाख रुपये इतके अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात पर्यावरणपूरक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने हे धोरण महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सध्या जीसीसी मॉडेलवर 5,150 ई-बसचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा : MBA – MMS CET निकाल जाहीर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *