मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात; पाच MILK भेसळखोरांना अटक

मुंबई :

भेसळयुक्त दुधाचा पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांना चाप बसविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) वारंवार कारवाई केली जाते. त्याचधर्तीवर मागील आठवडाभरापासून एफडीएने दूध भेसळखोरांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. त्यानुसार एफडीएने गुन्हे प्रकटीकरण शाख युनिट क्रमांक ९ च्या मदतीने वर्सोवा येथे कारवाई करून पाच दूध भेसळखोरांना अटक केली आहे.

सकाळी ४.३० वाजता केली कारवाई

एफडीएच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीसुनार वर्सोवा परिसरामध्ये दुधामध्ये भेसळ करण्यात येत आहे. त्यानुसार एफडीएचे अन्न सुरक्षा अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण शाख युनिट क्रमांक ९ ने संयुक्तरित्या माहिती मिळालेल्या चार ठिकाणी ९ एप्रिल रोजी सकाळी ४.३० वाजता छापे टाकले. एफडीएचे सहआयुक्त म.ना. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) डॉ. भुषण मोरे यांच्या सूचनेनुसार अन्न सुरक्षा अधिकारी ऋतुजा जाधव, रामू माळी, श्रीपाद धरंगुट्टी व प्रतिक्षा मसुगडे यांच्या सहाय्याने ही कारवाई केली.

छाप्यात ६२१ लिटर Milk केले नष्ट

या छाप्यामध्ये दुधात भेसळ करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली. या पाचही जणांविरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफडीए व पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये एकूण दुधाचे ८ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. तसेच ३६ हजार २१९ रुपये किमतीचे ६२१ लिटर दूध नष्ट करण्यात आले.

मुंबई सीमेवर दुधाच्या गाड्यांवर कारवाई voice ofeastern
मुंबई सीमेवर दुधाच्या गाड्यांवर कारवाई

मुंबई सीमेवर केली होती कारवाई

मुंबई शहर व उपनगरात बाहेरून येणाऱ्या दुधाच्या गाड्यांची मागील आठवड्यामध्ये शहराच्या सीमेवरील टोल नाक्यांवर रात्री विशेत तपासणी करण्यात आली. या विशेष तपासणी मोहीमेमध्ये मुलुंडमधील आनंद नगर आणि एलबीएस मार्गावरील टोल नाका, दहिसर, मानखुर्द, शिवडी आणि ऐरोली या सहा ठिकाणी एफडीएच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली होती. या विशेष मोहीमेत एफडीएच्या पथकांनी ११ हजारपेक्षा अधिक दुधाचा साठा ताब्यात घेऊन जप्त केला. तसेच निकृष्ट साठा सील करून पुन्हा उत्पादकांकडे पाठविण्यात आला. तसेच ९० लिटर असुरक्षित साठा तात्काळ नष्ट केला. या कारवाईमध्ये एफडीएच्या पथकाने एकूण १९५ नमुने ताब्यात घेतले. त्यापैकी तपासणीनंतर १८८ नमुने प्रमाणित, ६ नमुने निकृष्ट व एक नमुना असुरक्षित आढळून आला.

भेसळमुक्त व दर्जेदार Milk उपलब्ध करण्यास कटिबद्ध

नागरिकांना भेसळमुक्त व दर्जेदार दूध उपलब्ध व्हावे यासाठी एफडीएकडून अधूनमधून अशा प्रकारच्या मोहीमा राबविण्यात येतात. नागरिकांना सकस आहाराचा पुरवठा व्हावा यासाठी एफडीए कटिबद्ध आहे. नागरिकांनीही संशयास्पद अन्नपदार्थांबाबत विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : PAT exam – शिक्षकांअभावी सफाई कामगारांनी घेतली परीक्षा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *