students Shift : इमारती धोकादायक ठरवत ३५०० विद्यार्थ्यांचे स्थलांतर

माहीम, कुलाब्यापाठोपाठ आता वरळीतील शाळाही धोकादायक

मुंबई :

मागील तीन वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या शाळांच्या इमारती धोकादायक ठरवत जवळपास ३५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये हलविले आहे. न्यू माहीम स्कूल, कुलाबा व घाटकोपरमधील टिळक रोड शाळेपाठाेपाठ आता मुंबई महानगरपालिकेकडून वरळीच्या समुद्र किनाऱ्यासमोर असलेली शाळा धोकादायक ठरवून त्या शाळेतील ६०० विद्यार्थ्यांना अन्य शाळेमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शाळा धोकादायक ठरवत विद्यार्थ्यांचे स्थलांतर voice of eastern
शाळा धोकादायक ठरवत विद्यार्थ्यांचे स्थलांतर

मुंबई महानगरपालिकेने मागील वर्षी माहीम येथील ‘न्यू माहीम स्कुल’ या शाळेची इमारत धोकादायक ठरवत येथील विद्यार्थ्यांना धारावी तसेच इतरत्र शाळांमध्ये हलविले. या शाळेची इमारत धोकादायक नसतानाही तिला धोकादायक इमारतीच्या श्रेणीमध्ये टाकण्यात आले. त्यामुळे या शाळेत शिकत असलेल्या सुमारे १५०० विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये हलविण्यात आले. स्थलांतरित केलेली शाळा ही विद्यार्थ्यांच्या घरापासून फारच दूर असल्याने त्यांना शाळेत जाण्यासाठी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ चालत जावे लागत होते. शाळा लांब असल्याने विद्यार्थी व पालकांची गैरसोय होत होती. त्यानंतर कुलाबा येथील महापालिकेची शाळा धोकादायक घोषीत करून या शाळेतील ११०० विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्याच आसपासच्या शाळांमध्ये हलवण्यात आले. त्यापाठोपाठ घाटकोपरमधील टिळक रोड शाळेची इमारत विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित असल्याचे सांगत पालिकेने येथील सुमारे ४०० विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये पाठवले. पवई येथील पाचपोली भागात असलेल्या दोनपैकी एका शाळेतील विद्यार्थी पालिकेने दुसऱ्या शाळेत वर्ग केले.

मुंबई महानगरपालिकेने टप्प्याटप्याने या शाळा धोकादाय ठरवत त्यामधील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत स्थलांतरित केल्यानंतर आता वरळी समुद्रकिनाऱ्यासमोर असलेल्या महानगरपालिकेच्या शाळेच्या इमारतीचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) डिसेंबरमध्ये करण्यात आले होते. या लेखापरीक्षणच्या अहवालानुसार ही इमारत सी२बी श्रेणीत असून या श्रेणीनुसार संबंधित इमारतीत दुरुस्तीचे काम करून ती इमारत पुन्हा वापरात आणता येऊ शकते. मात्र, महानगरपालिकेने या शाळेतील इयत्ता सहावी ते दहावीच्या सुमारे ६०० विद्यार्थ्यांना जवळच्या सासमिरा शाळेमध्ये हलवण्याबाबतच्या सूचना पालकांना दिल्या आहेत.

students च्या पालकांकडून संताप व्यक्त

शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्या सुरू होणार आहेत. या कालावधीत महानगरपालिकेने या शाळेच्या डागडुजीचे काम पूर्ण करावे. त्यामुळे विद्यार्थांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. तसेच जूनपासून मुले त्याच शाळेत शिकू शकतात, असे पालकांकडून सांगण्यात आले. सासमिरा महानगरपालिकेच्या शाळेत अनेक सोयीसुविधा नसल्याचे सांगत पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेचे म्हणणे

संबंधित शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना जवळच्याच शाळांमध्ये स्थलांतरित केल्याने त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा :  दहावीच्या अतिरिक्त परीक्षेसाठी fees घेणाऱ्या शाळांवर कारवाई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *