Mangal Prabhat Lodha: किंग एडवर्ड हा कसाब सारखा, त्याचे समर्थन करणाऱ्यांचा धिक्कार
मुंबई :
किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालय नामांतरासंदर्भात आज विधानपरिषदेत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले.
लोढा यांनी स्पष्टपणे नमूद केले की, ब्रिटिश सत्ताकाळ हा भारताच्या शोषणाचा काळ होता. “किंग एडवर्ड हा भारतासाठी गौरवाचा विषय नसून, तो गुलामगिरीच्या काळाचे प्रतीक आहे,”. ते पुढे म्हणाले की, “किंग एडवर्डने भारताला गुलाम केले होते आणि देशाची संपत्ती लुटून इंग्लंडला नेली. किंग एडवर्डने पैसे दिले, ही दिशाभूल करणारी बाब आहे,” या संदर्भात त्यांनी कठोर शब्दांत टीका करत म्हटले की, “लाखो भारतीयांच्या मृत्यूला जबाबदार हा किंग एडवर्ड कसाब सारखा माणूस होता. किंग एडवर्डच्या नावाचे समर्थन करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो. KEM च्या नामांतरासाठी आम्ही ३ नावांचे पर्याय दिले असून सरकार त्याबाबत योग्य निर्णय घेईल. सुचवलेल्या तिन्ही नावाच्या पर्यायापैकी कोणताही पर्याय निवडल्यास त्या नावाचे संक्षिप्त रूप हे KEM हेच असेल हे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.
Mangal Prabhat Lodha : माझा व्यवसाय संपूर्ण जगाला माहित आहे
ट्रम्प टॉवरचे नाव बदलण्याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले की, ट्रम्पचे नाव हे केवळ व्यावसायिक भागीदारीमुळे देण्यात आले असून त्याचा कोणत्याही प्रकारच्या गौरवाशी संबंध नाही. दरम्यान, विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या व्यवसायावर प्रश्न उपस्थित केला. यावर प्रत्युत्तर देताना लोढा यांनी “माझा व्यवसाय संपूर्ण जगाला माहित आहे; उत्पन्नाचा स्रोत ज्ञात आहे. मात्र तुमचा व्यवसाय काय आहे हे आम्हाला माहिती नाही. तरीही तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या गाडीतून फिरता, असा उलट प्रश्न केला”



