Mumbai Mayor : महापौरांच्या वाहनातून नवजात कन्येचा पहिला खास प्रवास
मुंबई :
पावसाच्या हलक्या सरी कोसळत असताना घाटकोपरच्या संत मुक्ताबाई रुग्णालयाबाहेर एक आई आपल्या नवजात कन्येला घेऊन रिक्षाची वाट पाहत होती. पाऊस पडत असल्याने घरी जाण्याची घाई, हातात बाळ आणि तासभर वाट पाहूनही रिक्षा मात्र मिळत नव्हती. त्यातच हातातील बाळ रडत असल्याने तिचा जीव कासावीस झाला होता. त्याचवेळी त्या रस्त्यावरून जाणाऱ्या मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी त्या नवजात कन्येचा रडण्याचा आवाज ऐकला. तावडे यांनी गाडी थांबवत त्या महिलेची विचारपूस करून क्षणाचाही विलंब लावता मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे या नवजात कन्येचा रुग्णालय ते घरापर्यंत प्रवास खास ठरला.
मुंबईतील विविध भागांमध्ये गुरुवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळत असताना घाटकोपरमधील संत मुक्ताबाई रुग्णालयासमोर एक बाळंतीण आपल्या नवजात कन्येला घेऊन रिक्षाची वाट पाहत उभी होती. पाऊस पडत असल्याने घरी लवकर घरी जाता यावे यासाठी ती व तिचे कुंटुंबिय रिक्षा थांबविण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते. त्यातच हातातील बाळ रडत असल्याने त्या महिलेचा जीव अधिकच कासावीस झाला होता. त्याचवेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे संत मुक्ताबाई रुग्णालयातील आपला पाहणी दौरा आटपून बाहेर पडत असताना त्यांनी रस्त्याच्या कडेला एका महिलेला पाहिले. अशा वेळी, रुग्णालयातील पाहणी दौरा आटोपून बाहेर पडताना, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी त्या नवजात कन्येचा रडण्याचा आवाज ऐकला. तिच्या आईच्या डोळ्यांतली काळजी पाहून रितू तावडे यांनी थांबून त्या महिलेची विचारपूस केली. प्रसंग लक्षात येताच, क्षणाचाही विलंब न लावता महापौर तावडे यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.
Mumbai Mayor : महापौर यांनी एका आईची वेदना तात्काळ ओळखली
एक महिला म्हणून महापौर यांनी एका आईची वेदना तात्काळ ओळखली. रितू तावडे यांनी त्या बाळंतीणीला आणि तिच्या नवजात कन्येला स्वतःच्या महापौर वाहनातून कुर्ला येथील खैरानी मार्गावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संकुलातील तिच्या घरी सुरक्षितपणे नेले. वाहनामध्ये महापौर यांनी स्वतः त्या नवजात कन्येला आपल्या कुशीत घेऊन खेळवले. त्यानंतर तिच्या आईकडे सोपवून त्या नवजात कन्येला भरभरून शुभेच्छा दिल्या. जन्म झाल्यानंतर रुग्णालयातून पहिल्यांदाच घरी निघालेल्या या नवजात कन्येचा प्रवास थेट मुंबईच्या महापौरांच्या वाहनातून झाल्याने तिच्यासाठी हा प्रवास ‘खास’ ठरला आहे. हा क्षण त्या बाळंतीणीसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी एक संस्मरणीय आणि भावणिक ठरला. महापौरांनी त्या कन्येचे स्वागत करत तिला व तिच्या आईला भरपूर शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा : J.J.Hospital : जे. जे. रुग्णालयात एमआरआयसाठी दोन महिन्यांची प्रतीक्षा
या कृतीतून ‘कन्या हीच शक्ती’ आणि ‘माणुसकी हाच धर्म’ हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला. त्याचप्रमाणे, या प्रसंगाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, मोठेपण पदात नसते, ते मनात असते. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्या कृतीतून ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.



