Marking Scheme : एमबीए/एमएमएस सीईटी परीक्षेच्या गुणांकन पद्धतीत बदल
व्यवस्थापनाची सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; २०० प्रश्नांऐवजी १५० प्रश्न व २०० गुणाऐवजी १५० गुण. पीजीडीएम व पीजीसीएमसाठीही हाच अभ्यासक्रम व हिच गुणांकन पद्धत
मुंबई :
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२७ -२८ साठी पदव्युत्तर मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (MBA), मास्टर मॅनेजमेंट स्टडीज (MMS), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (PGDM) व पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट (PGCM) या चार व्यवस्थापन व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या २०२७ च्या सीईटी प्रवेश परीक्षेच्या तारखा सीईटी कक्षाने जाहीर केल्यानंतर या तीन अभ्यासक्रमाच्या २०२७ च्या सीईटी प्रवेश परीक्षेच्या गुणांकन पद्धतीत विद्यार्थीभिमुख बदल करण्यात आला आहे.

यापूर्वी एमबीए व एमएमएस सीईटी परीक्षेला पाच पर्याय असलेले बहुपर्यायी वस्तुनिष्ठ २०० प्रश्न होते, याला २०० गुण होते व वेळ १५० मिनिटे होती. यामध्ये बदल करण्यात आला असून २०२७ च्या सीईटी परीक्षेला पाच पर्याय असलेले बहुपर्यायी वस्तुनिष्ठ १५० प्रश्न राहणार आहेत, गुण देखील १५० असणार आहेत व वेळ १२० मिनिटे राहणार आहे. या बदलामुळे एमबीए व एमएमएस सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
Marking Scheme : व्यवस्थापनाची सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम
२०२७ मध्ये व्यवस्थापनाच्या एमबीए, एमएमएस, पीजीडीएम व पीजीसीएम या चार अभ्यासक्रमाच्या सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तीन विभागात विभागाला असून लॉजिकल /अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग (Logical/ Abstract Reasoning), कॉन्टिटेटिव्ह ॲप्टिट्यूड (Quantitative Aptitude) व व्हर्बल ॲबिलिटी ॲन्ड रिडिंग कॉम्प्रेहेन्सन (Verbal Ability and Reading Comprehension) या तीन विभागामधून १५० गुणांचे १५० प्रश्न असतील व यासाठी १२० मिनिटाचा वेळ असेल. या परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल व यात निगेटिव्ह मार्किंग पद्धत नसेल. हि परीक्षा ऑनलाईन संगणक आधारित असेल.
पीजीडीएम व पीजीसीएमसाठीही हाच अभ्यासक्रम व हिच गुणांकन पद्धत
व्यवस्थापनाच्या एमबीए व एमएमएस या अभ्यासक्रमाच्या सीईटीचा हा अभ्यासक्रम व गुणांकन पद्धत पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (PGDM) व पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट (PGCM) या नवीन दोन अभ्यासक्रमालाही लागू राहणार आहे. २०२७ च्या सीईटीसाठी व्यवस्थापनाचे हे दोन अभ्यासक्रम प्रथमच समाविष्ट झाले आहेत.
२०२७ मध्ये व्यवस्थापनाच्या एमबीए, एमएमएस, पीजीडीएम व पीजीसीएम या चार अभ्यासक्रमाच्या सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी असे सीईटी कक्षानी सूचित केले आहे. याचा सविस्तर अभ्यासक्रम सीईटीच्या https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



