Selection Grade : प्रशिक्षण शुल्क दोन हजार, मात्र सुविधांची वानवा

मुंबई, ठाणे परिसरातील शिक्षकांकडून संताप

मुंबई :

शिक्षकांना त्यांच्या सेवेच्या १२ वर्षांनंतर वरिष्ठ वेतनश्रेणी आणि २४ वर्षांनंतर निवडश्रेणी मिळण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) प्रशिक्षणे सुरू आहेत. मात्र मुंबई. ठाणे, वसई-विरार या परिसरातील शिक्षकांसाठी ठेवण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये नियोजनाचा अभाव असल्याने शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या शिक्षकांसाठी मुलुंडमध्ये प्रशिक्षण ठेवण्यात आल्याने पश्चिम उपनगरातील तसेच वसई-विरारच्या शिक्षकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे या प्रशिक्षणासाठी दोन हजार रुपये शुल्क घेऊनही शिक्षकांना चहा, नाश्ता किंवा जेवणाची व्यवस्था केलेली नाही. तसेच प्रशिक्षणादरम्यान दर तासाला हजेरी घेतली जात असल्याने शिक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Selection Grade voice of eastern
वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवडश्रेणी प्रशिक्षण

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) मुंबई व आसपासच्या परिसरातील १७३० शिक्षकांसाठी मुलुंडमधील दोन शाळांमध्ये प्रशिक्षण ठेवले आहे. मुंबई शहर, पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर, ठाणे आणि वसई-विरारमधील शिक्षकांना या केंद्रावर प्रशिक्षणासाठी बोलविण्यात आलेले आहेत. मात्र पश्चिम उपनगर व वसई विरारहून शिक्षकांना या प्रशिक्षणासाठी तब्बल दोन तास प्रवास करून सकाळी पोहचावे लागत आहे. त्यामुळे या शिक्षकांना पहाटे लवकर घर साेडावे लागत आहे. मुंबईमध्ये प्रशिक्षणस्थळ निवडताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि शिक्षकांचा प्रवासाचा वेळ विचारात न घेता सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांना सोयीचे ठरेल असे मध्यवर्ती ठिकाण निश्चित करण्याऐवजी पूर्व उपनगरांतील टोकाच्या उपनगरातील मुलुंडसारख्या ठिकाणाची निवड का केली असा प्रश्न शिक्षक उपस्थित करत आहेत. यामुळे शिक्षकांना आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो.

Selection Grade : शिक्षकांना स्वतःचा डबा घेऊन यावा लागत आहे

या प्रशिक्षणासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थी शिक्षकाकडून दोन हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रशिक्षणस्थळी चहा व जेवणाची व्यवस्था नसल्याने शिक्षकांना स्वतःचा डबा घेऊन यावा लागत आहे. प्रशिक्षणासाठी शुल्क आकारले जात असताना मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याने या शुल्काचा विनियोग नेमका कोणत्या बाबींवर केला जात आहे, असा प्रश्न पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी केला आहे. प्रशिक्षणाच्या प्रत्येक तासाला उपस्थिती घेणे आणि स्वतंत्रपणे सह्या करण्याची पद्धत शिक्षकांसाठी त्रासदायक ठरत आहे. प्रत्येक तासाला उपस्थिती घेण्याची पद्धत तातडीने पूर्णपणे रद्द करून प्रशिक्षणाच्या सुरुवातीला आणि दिवसाअखेरीस एकदाच उपस्थिती नोंदविण्याची सुलभ पद्धत लागू करावी, अशी मागणी असे महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षा हेमलता गावित यांनी केली आहे.

हेही वाचा : Dadar Passenger : कोकणची दादर पॅसेंजर रखडली; रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची प्रतीक्षा

Views: 20

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत