Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या ‘दिवाळी संध्या’तून परदेशी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरेची ओळख

६१ देशांतील ३४५ विद्यार्थी आणि २८ देशांच्या वाणिज्य दूतावासांचे प्रतिनिधी सहभागी

मुंबई :

भारतीय संस्कृती, परंपरा आणिदिवाळीउत्सवाचे महत्त्व आंतरराष्ट्रीयविद्यार्थ्यांपर्यंतपोहोचविण्यासह विविध देशांमधील सांस्कृतिक आणि शैक्षणिक मैत्रीचे बंध अधिक दृढकरण्याच्याउद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने‘दिवाळीसंध्या’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यामध्ये२८हून अधिक देशातील वाणिज्य दुतावासआणि६१हून अधिक देशातील३४५ परदेशी विद्यार्थी सहभागी झालेहोते. या परदेशी पाहूण्यांनी खास भारतीय व्यंजन आणिफराळाचाआस्वादहीघेतला.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील प्रांगणात ४ नोव्हेंबर रोजी ‘दिवाळी संध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांच्यासह अफगाणिस्तान, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, बेलारूस, ब्रिटन, कॅनडा, चिली, चीन, झेक प्रजासत्ताक, इजिप्त, फ्रान्स, इंडोनेशिया, इराण, इराक, आयर्लंड, इटली, जपान, कोरिया, मॉरिशस, मेक्सिको, ओमान, रशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, थायलंड आणि तुर्की या देशांच्या वाणिज्य दूतावासांचे प्रतिनिधी आणि मुंबई विद्यापीठात शिकत असलेले परदेशी विद्यार्थी सहभागी झाले होते.

जागतिक स्तरावरील ज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाच्या प्रवाहात भारतीय उच्च शिक्षण संस्थांचा सक्रिय सहभाग वाढविणे आवश्यक असून या दिशेने मुंबई विद्यापीठ मार्गक्रमण करीत असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. या प्रक्रियेत मुंबई विद्यापीठाची भूमिका केवळ आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्यापुरती मर्यादित नसून, भारताची ज्ञानपरंपरा, संशोधन क्षमता आणि सांस्कृतिक वैविध्य जागतिक स्तरावर पोहोचविण्याचीही असल्याचे त्यांनी सांगितले. विविध ६१ देशांतील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाची निवड करणे, ही विद्यापीठाच्या शैक्षणिक विश्वासार्हतेची आणि आंतरराष्ट्रीय आकर्षणाची महत्त्वपूर्ण पावती आहे. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच भारतीय संस्कृती, मूल्यपरंपरा आणि सामाजिक विविधतेचा अनुभव मिळावा, तसेच त्यांना जागतिक नागरिक म्हणून विकसित होण्यासाठी अनुकूल वातावरण मिळावे, यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दिवाळी संध्या कार्यक्रमात विद्यार्थी विकास विभागामार्फत सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी शास्त्रीय नृत्याद्वारे गणेश वंदना, दिवाळी गाणी, बोहाडा आदीवासी नृत्य, सडपा-संथाली, दिवली आणि करघम लोकनृत्य सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांच्यासह सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे आणि विद्यार्थी विकास विभागातील जिल्हा समन्वयक व कर्मचाऱ्यांनी केले.

हेही वाचा : Skill Training : राज्यात १०० महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्रांना मान्यता; ३०० चौ. फुटांच्या जागेत सुरू होणार

Views: 1

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत